
नाशिक:(प्रतिनिधी)-चौथ्या अ.भा.शेकोटी लोककला साहित्य संमेलनाच्या नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिका अलका दराडे आणि स्वागताध्यक्ष ज्येष्ठ कवयित्री सुनंदा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

नाशिक कवी संस्थेचे अध्यक्ष इंजि. बाळासाहेब मगर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आ.नानासाहेब बोरस्ते, साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जोशी, जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, प्राचार्य प्र.द.कुलकर्णी, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, शेकोटी कविसंमेलनाचे अध्यक्ष विवेक उगलमुगले, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार, कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर यांच्या उपस्थितीत त्यांचा मानपत्र आणि पदक देऊन सत्कार करण्यात आला.

जिल्ह्यातील साहित्यिक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अलका दराडे आणि सुनंदा पाटील यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाध्यक्ष बाळासाहेब मगर यांनी अलका दराडे, सुनंदा पाटील यांची अध्यक्ष आणि स्वागताध्यक्षपदी झालेली निवड म्हणजे साहित्यसेवेसह स्त्रीशक्तीचा अनोखा गौरव असल्याचे गौरवोदगार काढले.
पोपटराव देवरे यांनी प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. मधुकर गिरी यांनी आभार मानले.
