
नाशिक ता.मानवी जिवन अनुभवानी पुर्ण होते त्या बरोबर जीवन जगताना आशावादी राहिले पाहिजे. असे प्रतिपादन आनंद अहिरे यानी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठान तर्फे हुतात्मा स्मारक येथे आयोजित पुस्तकावर बोलू काही या अभिनव उपक्रमात २१३ वे पुष्प गुफताना आनंद अहिरे जगायचं राहुनच गेलं या पुस्तकावर ऐसपैस या गप्पा करत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक कुमावत होते.
आनंद अहिरे पुढे म्हणाले की,माणुस प्रगल्भ होत जातो तो आपल्या अनुभवानी, माणसाचे निसर्ग. नियती पुढे काहिच चालत नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या राहुन जातात. शेवटच्या उबरठ्या पर्यंत खुप काही जेव्हा राहतात. तेव्हा माणुस आतल्या आत खचत जातो. मनातील काही कल्पना जेव्हा पुर्ण होत नाही तेव्हा दिलेले आश्वासन पुर्ण करु शकत नाही ही खंत वाटते, पाऊस, आठवण, जगायचं मला, आधार, उध्वस्त, हिरव स्वप्न अशा कविता मधून जगण्याचा शोध घेताना आयुष्य कस जगायचं हे आपल्याला ठरवायचं असते.
यावेळी अजित कुलकर्णी मधुकर गिरी या भाग्यवान श्रोत्याना ग्रथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले.
आभार अशोक पाटील यानी मानले सुरेश पवार यानी सुत्रसंचालन केले.
दरम्यान येत्या मंगळवार ३० डिसेंबर रोजी भारती देव ईच्छा या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
