
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१३१ वा दिवस
हा सत् स्वरुप आत्मा इंद्रियांच्या फार फार पलीकडे आहे. इंद्रिये ही केवळ बाह्य वस्तूंचाच अनुभव घेतात. पण स्वयंभू आत्म्याचे दर्शन आपल्या आत होत असते. आत्मज्ञानाला अधिकारी कोण हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. जो आपली दृष्टी अंतर्मुख करून हा आत्मा जाणून घेण्याची इच्छा करतो, तो आत्मज्ञानाचा अधिकारी होय. जेव्हा मनुष्याचे जीवितकार्य निश्चित होते, त्याला जीवनाचे ध्येय सापडते तेव्हा खऱ्या अर्थाने जीवनास प्रारंभ होतो.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष ६ शके १९४७
★ पौष शुध्द /शुक्ल ६
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. २६ डिसेंबर २०२५
★ १५३० हिंदुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक, मुघल बादशहा बाबरचा मृत्यू
★ १९१४ कुष्ठरोग्याच्या पुनर्वसनासाठी आयुष्यभर प्रयत्न करणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देवीदास उर्फ बाबा आमटे यांची जयंती
★ १९४८ डॉ. प्रकाश बाबा आमटे यांचा जन्मदिन
★ १९९९ भारताचे माजी राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांचा स्मृतीदिन.
