
महान गायक पद्मश्री मोहम्मद रफी यांच्या जयंती निमित्ताने आयोजित संगीत मैफिलीत पोलिस उपअधीक्षक श्री.बाजीराव महाजन यांच्यासोबत ओमकार संगीत विद्यालयाचे गुरुवर्य श्री.सुनील खांगळ–पाटील यांचेसह विद्यालयाचे गायक ,गायिका व शिष्यगण.
मनमाड(प्रतिनिधी)- येथील देवगंधर्व संगीत महाविद्यालय संचलित ओमकार संगीत विद्यालयाया वतीने सुप्रसिद्ध गायक पद्मश्री मोहम्मद रफी साहेब यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने २४ डिसेंबर रोजी येथील लोकमान्य सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संगीत मैफिलीद्वारे अभिवादन करण्यात आले.
गुरुवर्य सुनिलजी खांगळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध शास्त्रीय,उपशास्त्रीय व रागदारी प्रकारातील विविधांगी चित्रपट गीते सादर केली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मनमाड येथील मोहम्मद रफी यांचे निस्सिम चाहते रसिकाग्रणी कांतिलालजी येणारे,पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन,आबासाहेब दिंडोरकर, रा. शि. संस्थेचे अध्यक्ष विक्रमदादा सप्रे व साहित्यिक संदीप देशपांडे,राम महाले उपस्थित होते.
मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापुजन करुन थोर गायक मोहम्मद रफी यांना अभिवादन करण्यात आले.मोहम्मद रफी यांच्या विविधांगी गायकीचा आढावा यानिमित्ताने ओमकार संगीत विद्यालयाचे संचालक गुरुवर्य सुनिलजी खांगळ–पाटील सर यांनी उपस्थितांना प्रास्ताविकातून करून दिला व कार्यक्रमाची थीम असलेले ’याद न जाये बीते दिनो की…’ हे गीत सादर केले.
त्यानंतर ओमकार संगीत विद्यालयाचे शिष्यगण सुरेंद्र भुजंग,आर्यन जोगदंड,गणेश गवळी,दीपक खरे,कु.पायल खैरमोडे, भारत मुद्दप,आम्रपाली
पगारे, ॲड. दिलीप देसले, अक्रम शेख इ.नी विविध बहारदार गाणी सादर केली.तबल्यावर कु.नेहल आरोटे हिने तर आर्यन जोगदंड यांनी हार्मोनियमवर साथ दिली.
या मैफिलीस
मनमाडकर संगीत रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.मैफिलीत सादर झालेली तेरे आँखोके सिवा दुनियामें रखा क्या है,तुम मुझे यू भूला न पाओगे,शोधीशी मानवा राउळी मंदिरी,ये गुलबदन,तू इस तरहसे मेरी जिंदगीमे शामील है,पत्ता पत्ता बूटा बूटा,मधुबनमे राधिका नाची रे!,अकेले है चले आओ,ये दिल तुम बीन कही लगता नही,आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे इ.गीते सादर करण्यात आली.प्रेक्षकांच्या आग्रहावरून चार रागांचे मिश्रण असलेले ’कुहू कुहू बोले कोयल या..!’हे गीतही लक्षवेधक ठरले.
गुरुवर्य सुनील खांगळ –पाटील सर यांनी राग दरबारीची उत्पत्ती व वैशिष्ट्ये सांगून सदर रागाचा विस्तार करून एकच रागातील विविध गीतांचे मुखडे सादर करून संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत यावेळी विद्यालयाच्या वतीने करण्यात आले.पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन,आबासाहेब दिंडोरकर व साहित्यिक संदीप देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले व मनमाडच्या संगीत क्षेत्रात ओमकार संगीत विद्यालयाच्या विविध सांगीतिक उपक्रम स्तुत्य व अनुकरणीय असल्याचे सांगितले.अशा उपक्रमांमुळे नव्याने संगीत क्षेत्रात येणाऱ्या कलावंतांना संधी उपलब्ध होते असे मत कांतीलाल येणारे यांनी मैफिलीचा समारोपप्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रनिवेदन जनार्दन देवरे यांनी केले तर सुरेंद्र भुजंग यांनी आभार मानले. विद्यालयाच्या कार्यवाह मीनाताई खांगळ,संचालिका सौ. योगिता खांगळ ,अभिजित खांगळ ,ॲड.चंद्रकांत उबाळे ,गणेश गवळी,एस.एम.जोहरे सर,दीपक खरे,सौ.सप्रे वाहिनी,मोनी तसंबड या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व मध्य रेल्वे माध्य.विद्यालयाचे
गायधनी सर व त्यांचे सहकारी यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेत कार्यक्रमाचे संयोजन केले.
