
वाखारी ( प्रतिनिधी) किसान माध्यमिक विद्यालयाची एकांकिका ठरली सर्वोत्कृष्टनाशिक शिक्षण प्रसारक मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या कै.वा.श्री.पुरोहित एकांकिका स्पर्धेत किसान माध्यमिक विद्यालय वाखारीची एकांकिका ‘शेवटची हाक पृथ्वीची’ सर्वोत्कृष्ट ठरली आहे.स्पर्धेचे हे ४६ वे वर्ष आहे. संस्थेतील ग्रामीण, शहरी आणि प्राथमिक व माध्यमिक स्थरावर पहिल्या फेरीत निवड केली जाते.

प्राथमिक फेरी संकुल निहाय होते. नांदगाव संकुलात व्हि.जे हायस्कूल येथे स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला. या वर्षी एकूण ३० एकांकिका आणि ४४८ कलावंतांनी सहभाग घेतलेला होता. अंतिम फेरी धामणकर सभागृह पुरुषोत्तम हायस्कूल नाशिकरोड येथे बुधवार दिनांक २४ डिसेंबर २०१५ रोजी पार पडली.

अंतिम फेरीमध्ये सहभागी तीन एकांकिका पैकी ‘शेवटची हाक पृथ्वीची’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. एकांकिकेचा विषय होता प्लास्टिकचे जगावरील संकट यासाठी शालेय समितीचे अध्यक्ष प्रेरणा श्री. विजय चोपडा यांची होती तर मार्गदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. खंडू खालकर यांनी केले. एकांकिकेतील कलाकार म्हणून कृष्णा सानप-सुत्रधार, ओमकार सानप -प्लास्टिक महाराज, आम्रपाली उशिरे- ई- कचरा (रोबोटिक),वेदांत काकळीज- वायू कोमल राहणे- नदी, काजल चव्हाण- पृथ्वीमाता, आराध्या पाटील-काकू, श्रावणी गांगुर्डे-संजना, सार्थ काकळीज -मायक्रो प्लास्टिक,दिव्या राहणे- बालिका, निशा मोकळ -आजी ,क्रांती चव्हाण- प्लास्टिक बॉटल, शिवा काकळीज- स्वच्छता दूत, आणि वेदांत सोनवणे याने भविष्यातील मानव म्हणून पात्र साकारले.एकांकिकेचे दिग्दर्शक स्वप्निल महाले, लेखन आणि सह दिग्दर्शन चव्हाण ज्योत्स्ना आण्णासाहेब यांनी केले. संगीत साथ नंदू दवंगे यांनी दिली, नेपथ्य दिलीप भडांगे यांचे होते. वेशभूषेसाठी रत्नप्रभा पाटील, निवेदक म्हणून योगेश कुलकर्णी, इतर तांत्रिक सहाय्य सुनील हिंगमिरे, प्रशांत वाघ यांनी परिश्रम घेतले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपली कला उत्कृष्टपणे सादर केली. अत्यंत कमी खर्चात नेपथ्य करण्यात आले. अगदी कलाकारांचे ड्रेस सुद्धा भाड्याने आणलेले नव्हते. ज्वलंत विषयावर आधारित कथालेखन श्रीमती ज्योत्स्ना चव्हाण मॅडम यांनी केले. दिग्दर्शक, सर्व कलाकार आणि टीमचे सर्व घटक, मार्गदर्शक, सपोर्ट स्टाफ यांनी सर्वोत्तम योगदान दिले. ‘परीक्षकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता निरपेक्षपणे परीक्षण करावे याबाबत स्पष्ट सूचना सेक्रेटरी येवला सरांनी दिल्याचे परीक्षकांनी सांगितले.’ – संस्थेचे सेक्रेटरी श्री येवला सर आणि संस्था पदाधिकारी तसेच शालेय समिती अध्यक्ष विजय चोपडा, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनिष चव्हाण, विद्यार्थी सुरक्षा समिती अध्यक्ष काशिनाथ सोनवणे आणि विविध समित्यांचे पदाधिकारी यांनी शाळा प्रमुख आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.
