
सिन्नर ( प्रतिनिधी ) २५ डिसेंबर २०२५ येशु ख्रिस्त यांच्या जयंतीनिमित्त (नाताळ) महामित्र परिवार च्या वतीने साजरा करण्यात आला
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व येशु ख्रिस्त यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले
यावेळी महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की नाताळ हा सण जगभरात उत्सव साजरा करतात प्रभू येशूबद्दल लोकांच्या हृदयात वाढत चाललेले प्रेम पाहून अंधश्रद्धा पसरवणाऱ्या धर्मांधांनी त्यांचा कडाडून विरोध केला. त्यामुळे ज्यू राजा पोन्टियन्सने प्रभु येशूला रोखण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. पण, यामुळे ते विचलित न होता धर्माचा प्रचार करत राहिले. राजा पॉन्टियन्सला भीती वाटली की, जर त्याने प्रभु येशूला थांबवले नाही तर ज्यू कदाचित क्रांती करू शकतात. यासाठी प्रभु येशूला मृत्यूदंड देण्यात
प्रभू येशूला शिक्षा म्हणून वधस्तंभावर खिळवण्यात आले, तो दिवस शुक्रवार होता. जेव्हा ते मृत्युमुखी पडले तो दिवस दुःखाचा दिवस गुड फ्रायडे दुःखाचा दिवस पाळला जातो आणि येशू ख्रिस्त हे ख्रिस्ती धर्माचे केंद्रस्थान आहेत, ज्यांचा जन्म २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि ज्यांनी जगाला प्रेम, शांती आणि क्षमेचा संदेश देणाऱ्या. अशा महान महात्मा येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश माळी यांनी केले व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले तर आभार राजेंद्र सातपुते यांनी मानले
याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे सुनील गोळे सर राजेंद्र देशमुख प्रशांत देशमुख प्रकाश माळी शरद शिरसाट सुरेश कालीवार सुभाष परदेशी सागर सागर गुजराती बाजीराव माळी धनंजय परदेशी राजेंद्र सातपुते अनिल सोनवणे गणपत काळे नामदेव कुटे गोपीनाथ वाजे उद्धव माळी आदि उपस्थित होते
