
गणूर ( प्रतिनिधी ) आज मंगळवार दिनांक 19/08 /2025 रोजी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा समाजदिन 2025 उत्साहात साजरा करण्यात आला. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ध्वजाचे ध्वजपूजन शालेय समिती सदस्य श्री शांताराम खंडू ठाकरे व ध्वजारोहन शालेय समितीचे सदस्य श्री शंकर त्र्यंबक ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शालेय समितीच्या विनंतीवरून गणुर सोसायटी चेअरमन श्री साहेबराव गांगुर्डे यांनी स्विकारले. यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपल्या मनोगतातून कर्मवीरांचे विचार व जीवनगाथा व्यक्त केली, विद्यार्थ्यांना शालेय पातळीवरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये तसेच इयत्ता ६ वी ते १० मधील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. शालेय समितीचे अध्यक्ष श्री अशोक काका सवंद्रे तसेच सर्व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य वि. का. सेवा सह. सोसायटी चेअरमन,व्हाय. चेअरमन,सदस्य, ग्रामस्थ, पालक, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती व्ही.पी.ठाकरे मॅडम शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होत.
