
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर यांजकडुन शेतकर्यानां खते बांधावर देण्याची सवंग घोषणा झाली खरी,पण या घोषणेला प्रशासनाने फारसे गांभीर्याने न घेतल्याने या योजनेचा फज्जा उडाला आहे. गंमत म्हंणजे खते बांधावर तर जाऊ दया खत विक्री दुकानातही वेळेवर मिळत नाही. मिळाले तरी चढया भावाने विक्री होते. शिवाय त्या बरोबर इतर अनावश्यक सामुग्रीही लादली जाते.यंदा खरीप हंगामाचे तोंडावर तरी या कारभारात सुधारणा होणार का असा सवाल नागरीक करत आहे. आम्ही शेतकर्याचे सरकार आहोत. शेतकरी हितासाठीच राबतो आहोत असा दावा सत्तेवरील हर एक सरकार करत असते खरे, मात्र अंमलबजावणीत कुचराई होत असल्याने शेतकरी हिताचे निर्णय, घोषणा कागदावरच राहतात हा नेहमीचा कटु व वास्तव अनुभव आहे. असाच एक निर्णय म्हंणजे खते बांधावरच दयायची घोषणा करणेत आली होती.या घोषणेचा पुर्णत; फज्जा उडाल्याचे वास्तव चित्र दिसत आहे. बांधावर तर जाऊ दया, पण प्रत्यक्ष खत विक्री केंद्रावर ही शेतकर्याची सर्रास अडवणुक केली जाते. नियमीत दरापेक्षा चढया दराने विक्री होत असुन, याच बरोबर अनावश्यक माल घेण्याचीही सक्ती केली जाते. दरम्यान प्रशासन यावर म्हणते कि संबधिताची तक्रार करा. तर तक्रार केली की सबंधिताकडुन कारवाई टाळणेसाठी आतुन तोडपाणी केली जाते.व तक्रारीचा फारसा उपयोग होत नाही. विक्री केंद्र व प्रशासन यांचे लागेबंधे असुन संबधिताचा आतुन चोरटा व्यवहार सुरु असतो.हे एक उघड सत्य आहे.गंमत म्हंणजे याची एक वर पासुन तर खालपर्यंत एक सुसुत्रिकरणात बांधलेली साखळी असल्याने पारदर्शी कारवाई होत नाही. यामुळे नियंत्रणाअभावी मोकाट कारभार सुरु आहे व तक्रारदारही नसते उपद् व्याप नको म्हणुन गप्प बसतो ही वस्तुस्थिति आहे. या खात्यालाही जेव्हा तुकाराम मुंढे सारखा खमका आधिकारी भेटेल तेव्हाच कारभारात झाली तर सुधारणा होईल अन्यथा बकरी ब्यें ब्यें करतच राहिल व तिचा बळी जातच राहिल.———————-खताचीं चढया दराने विक्री दरम्यान इगतपुरी तालुक्यातील जागरुक शेतकरी सुरेश कोकणे पाटिल यांनी चढया दराने खत विक्री बाबत समाजमाध्यामाद्वारे आवाज उठवलेला असुन,या विक्री केंद्रानां चाप लावण्याची मागणी केली आहे.
