
सिन्नर ( प्रतिनिधी )धरती आबा क्रांतिसूर्य बिरसा मुंडा व भारतीय संविधानाचे सदस्य जयपाल सिंह मुंडा
यांच्या संयुक्त चित्रदर्शिकेचे राष्ट्रसेवा दल निर्मित वितरण राष्ट्रसेवा दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा महामित्र दत्ता वायचळे यांच्या हस्ते शहीद बिरसा मुंडा स्मृतिदिनानिमित्त आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांचे सह संस्थापक विजय मुठे यांना देण्यात आले याप्रसंगी महामित्र परिवार व आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा दलाने दिनदर्शिकेमध्ये आदिवासी क्रांतिकारकांचा उल्लेख केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार
यावेळी महामित्र दत्ता वायचळे , अ.भा.आदिवासी विकास परिषद उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सोनूभाऊ मेंगाळ ,अ.भा.आदिवासी विकास परिषदेचे माजी उपतालुका अध्यक्ष संपत भाऊ मेंगाळ, गणेश पाटील, राजेद्र बेंडकुळे, संदिप मुठे, संदिप लोणारे ,आकाश धोंगडे, योगेश मोरे, शरद जाधव, किरण गाडेकर, लखन चव्हाण, शाम डांगे, रोहित मुठे, किरण मुठे ,समाधान लाड आदी उपस्थित होते
