
नांदगाव: (प्रतिनिधी)नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था,(न्यू. इंग्लिश स्कूल आवार) नांदगाव येथे आयटीआय प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अर्ज भरणे व समुपदेशन केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. प्रवेशप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे केंद्र कार्यरत राहणार आहे.राज्य शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत ऑगस्ट २०२६ सत्रासाठी केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ‘कौशल्य भारत, कुशल भारत’ या संकल्पनेंतर्गत राज्या- तील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज नोंदणी, पसंतीक्रम भरणे, अर्जदुरुस्ती, प्रवेशनिश्चिती, तसेच मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. अनेक विद्यार्थी सायबर कॅफे किंवा अन्य माध्यमांतून अर्ज भरताना अपूर्ण कागदपत्रे, ट्रेडविषयी अपुरी माहिती अथवा चुकीची माहिती भरल्यामुळे अडचणीत येतात. परिणामी विद्यार्थ्यांना इच्छित ट्रेडपासून वंचित राहावे लागू शकते. ही बाब लक्षात घेऊन संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध ट्रेडविषयी संपूर्ण समुपदेशन, तसेच मोफत ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेतील विविध फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून प्रवेशासाठी पात्र होण्यास मदत केली जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीपुस्तिका, नियमावली व कार्यपद्धती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन औ. प्र. संस्थेचे प्राचार्य हरिश्चंद्र ठाकरे यांनी केले.संपर्क:-१) चव्हाण सर- ९४०३५६०३१२ २) वाणी सर- ९०४९८८७६८३ ३)काकळीज सर- ९९२३९१४०४२ ४)बोराळे सर- ९६८९३२४२३७
