
११ जून २०२६ महाराष्ट्र ची माऊली साने गुरुजी यांचा ७६ व्या स्मृतिदिनानिमित्त महामित्र परिवार,राष्ट्र सेवा दल व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड च्या संयुक्त विद्यमाने सिन्नर येथील शिवाजी महाराज चौक येथे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” असं म्हणणारे साने गुरुजी उर्फ ‘ “पांडूरंग सदाशिव साने”हे केवळ समाजसुधारक, लेखक किंवा शिक्षक नव्हते तर ते विचारांनी विज्ञानवादीही होते.त्यांच्या लेखणातआणि विचारांतून त्यांनी अंधश्रद्धा जुन्या रूढी परंपरा जातिभेद यांचा नेहमीच विरोध केला आणि समाजाला बदलाची वैज्ञानिक दृष्टीकोणाची गरज पटवून दिली. साने गुरुजी यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता त्यांनी इ स १९३० साली शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेऊन त्यांनी ” काँग्रेस ” नावाचे साप्ताहिक काढले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ ल्या उपोषण केले आणि त्यांना प्रवेश मिळवून दिला. “बलसागर भारत होवो विश्वात शोभोनी राहो ” अशी काव्य रचना करणारे साने गुरूजी यांचा ११ जून १९५० रोजी मृत्यू झाला अशा महान महापुरुषाला विनम्र अभिवादन !
याप्रसंगी डॉ. आर.टी. जाधव यांनी साने गुरुजी यांच्या जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त करताना संपूर्ण माहिती त्यांनी दिली
यावेळी उपस्थित त्यांना साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या चित्रदर्शिका महामित्र परिवार दत्ता वायचळे यांच्याकडून वाटप करण्यात आले
या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रकाश माळी यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार सोमनाथ लोहारकर यांनी मानले
याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे,डाॅ.आर. टी.जाधव आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे प्रकाश माळी मनोज माळी सोमनाथ लोहारकर धनंजय परदेशी, राजेंद्र देशमुख, राजेंद्र सातपुते गोपीनाथ वाजे अजय शिंदे बापू चव्हाण धनंजय परदेशी भगवान पाचोरे आदि उपस्थित होते
