
नांदगाव ( प्रतिनिधी) मविप्र ही संस्था समाजधुरीनांच्या परीश्रमातुन उभी राहिली. आज या संस्थेचा मोठा विस्तार झाला असून महाराष्ट्रात दोन नंबरची संस्था ओळखली जाते. पुर्वीच्या काळी समाज हा निद्रिस्त अवस्थेत होता. हा समाज जागृत करण्यासाठी शिक्षणाची गरज लक्षात घेऊन १९१४ ला या संस्थेची स्थापना शाहु महाराज,म .फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेने कर्मवीर रावसाहेब थोरात, गणपत दादा मोरे, डी.आर.भोसले, काकासाहेब वाघ, भाऊसाहेब हिरे, आण्णासाहेब मुरकुटे या आद्य संस्थापक यांनी उदोजी बोर्डिंग येथे अवघ्या पाच विद्यार्थी घेऊन शाळा सुरू केली. पुढे ॳॅड. बाबुराव ठाकरे,ॳॅड.विठ्ठलराव हांडे, डॉ. वसंतराव पवार, निलीमाताई पवार आणि आज ॳॅड.नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मविप्र संस्थेचा विस्तार वाढला आहे. अकरा हजार कोटीचे बजेट या संस्थेचे आहे. या संस्थापकांनी समाज विकासाचा ध्यास घेऊन महान कार्य केले. तेव्हा या संस्थापिका चे आदर्श घेऊन तुम्ही देखील भविष्यात मोठे व्हा, आणि तुमची आयुष्याची पतंग अशीच उंच जावो असे प्रतिपादन न्यु.इंग्लिश स्कूल नांदगांव येथे मविप्र संस्थैच्या समाज दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. प्राचार्य व एम. जी.व्ही.एस.पी.एच.काॅलेज ॴॅफ मॅनेजमेंट ॳॅण्ड टेक्नाँलॉजी ,पंचवटीचे संचालक डॉ.दिलीप बी. शिंदे यांनी केले.यावेळीमाजी आमदार राजाभाऊ देशमुख, कनिष्ठ महाविद्यालयीन कमिटी अध्यक्ष शरद पाटील,स्कूल कमिटी अध्यक्ष विजय काकळीज, कुणाल देशमुख, विश्वास (बाळासाहेब) कवडे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य गवांदे,कृ.बा.स.संचालक समाधान पाटील,प्राचार्य डॉ. आर.एन.भवरे,न्यु.इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती जे.आर.काळे, , औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य के.पी.जाधव,आदर्श प्राथमिक चे मुख्याध्यापका ए.पी. साळुंके, होरायझनच्या मुख्याध्यापिका पी.डी.मढे,मविप्र बाह्यरुग्ण कक्ष विभाग प्रमुख डॉ. पी.व्ही.पगार, गुंडसर,एम.एस.माळी, दत्तात्रय काकळीज, अनिल सुभाष पाटील, रमेश बोरसे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते याप्रसंगी माजी विद्यार्थीनी वसुंधरा पाटील, यांनी शाळेसाठी संगीत साहित्य भेट दिले तसेच, राजेश पाटील यांनी पाण्याची गरज लक्षात घेऊन बोअरवेल करुन दिला व पाण्याची मोटार भेट दिली.ताराबाई काकळीज यांच्या सन्मानार्थ विजय काकळीज यांनी संकुलासाठी संगीत साहित्य भेट दिले. तर एम.जी. आहेर (मगर मॅडम) , जी.डी. आहेर यांनी साउंड सिस्टीम शाळेला भेट दिली, तसेच शाळेचे सेवा निवृत्त शिक्षक प्रकाश फणसे यांनी शाळेला खुर्च्या भेट देऊन शाखेबाबत आदरभाव व्यक्त केला. सुरवातीला रांगोळी प्रदर्शनाचे उद्धाटन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते झाले. त्यानंतर समाजध्वजाला मानवंदना देण्यात आली. व स्वागत गीत व आद्य संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.व प्रमुख अतिथी व मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नांदगाव तालुका संचालक इंजि. अमित बोरसे (पाटील) होते. ते अध्यक्षिय मनोगतात म्हणाले की, सत्यशोधक विचारसरतीवर आधारीत संस्थापकांनी इ.स.१९१४ ला. ही शिक्षण संस्था स्थापन केली. या संस्थेचा इतिहास पुढच्या पीढीला माहिती व्हावा म्हणून कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिन हा मविप्र संस्थेत समाजदिन म्हणून साजरा करण्यात येतो. सुरवातीला संस्थेला राजाश्रय मिळाला म्हणून ही संस्था प्रतिकूल काळातही टिकून राहिली. व आज या संस्थेचा मोठा विस्तार झाला आहे. कर्मवीरांनी जिल्ह्यातील अनेक देणगी दारांकडुन जलशा सारखे कार्यक्रम करुन या संस्थेचा विकास घडवुन आणला.आज नांदगांव तालुक्यात मविप्र संस्थेची प्रगती होत आहे. होरायझन ॳॅकेडमी, विज्ञानाच्या विविध लॅब, मेडिकल सुविधा, तसेच व्यवसाय कोर्सेस सुरु असुन शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. असे मनोगत नांदगाव तालुका संचालक इंजि.अमित बोरसे (पाटील) यांनी केले. यावेळी शाळेची माजी विद्यार्थीनी विद्या पाटील व स्कूल कमिटी अध्यक्ष विजय काकळीज यांनी ही संस्थेबाबत आदरभाव व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चव्हाण सर यांनी केले. याप्रसंगी न्यु.इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनीनी समाजधुरीनांचा गौरव करणारा सुंदर असा पोवाडा सादर करुन वातावरणात एक जल्लोष निर्माण केला.याला कल्पना अहिरे मॅडम यांनी संगीताची उत्तम साथ दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. बी.के. पवार, दत्तात्रय भिलोरे, डी.डी. पाटील यांनी केले प्रा. एस.ए. मराठे यांनी आभार मानले . या कार्यक्रमास नांदगांव महाविद्यालय, न्यु.इंग्लिश स्कूल, होरायझन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगांव,आदर्श प्राथमिक शाळा,मविप्र बाह्य रुग्ण कक्ष नांदगाव या शाखेचे सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
