
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२९८ वा दिवस
गुरु म्हणजे आध्यात्मिक शक्ती आमच्यापर्यंत आणणारे वाहन होय. गुरुरूपी माध्यमामधून अध्यात्मिक शक्ती तुमच्या-आमच्यापर्यंत पोहोचत असते शिकवू तर कोणीही शकतो, परंतु गुरूने शिष्यात आध्यात्मिक शक्तीचा संचार केला पाहिजे तरच अध्यात्मिक उन्नतीरुपी फळ येईल. एकाच गुरुच्या शिष्यांमध्ये एकमेकांत भावाभावाचा संबंध प्रस्थापित होत असतो आणि भारतातील कायद्यात हा संबंध स्वीकारला गेला आहे. त्याला भारतात कायद्याची मान्यता आहे. श्रीगुरु हे त्यांना स्वतःला पूर्वचार्यापासून लाभलेला मंत्र वा भावशक्तिमय शब्द शिष्यात संक्रमित करीत असतात. गुरुखेरीज कोणतीच साधना करता येणे शक्य नाही. नव्हे, नव्हे तर तसे करणे खरोखरच फार धोक्याचे देखील आहे. उपासना पद्धती भारतातील सर्वच साधकांमध्ये अत्यंत प्रचलित अशी पद्धती आहे जी गुरुद्वारे प्राप्त होत असते.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर जेष्ठ /शुक्रमास २१ शके १९४८
★ जेष्ठ अधिक वद्य /कृष्ण ११
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ गुरुवार दि. ११ जून २०२६
★ कमला एकादशी 🚩🚩🚩🚩🚩🚩
★ १८८१ लोकमान्य टिळकांनी “मराठा” हे इंग्रजी भाषेतील दैनिक सुरु केले.
★ १८८५ पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना.
★ १८९७ भारतीय स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल यांचा जन्मदिन
★ १९५० सुप्रसिध्द बालसाहित्यीक, “शामची आई” पुस्तकाचे लेखक, समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक पांडूरंग सदाशिव साने उर्फ सानेगुरुजी यांचा स्मृतीदिन.
