
सिन्नर( प्रतिनिधी) :- डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस ” समाजदिन ” म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे होते. देणगीदार संदेश वाजे यांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. कर्म.रावसाहेब थोरात, कर्म.काकासाहेब वाघ, कर्म. अण्णासाहेब मुरकुटे,कर्म. भाऊसाहेब हिरे, कर्म. बाबुराव ठाकरे,कर्म.वसंतराव पवार, कर्म.विठ्ठलराव हांडे, छत्रपती शिवाजी महाराज आदींच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गीतमंचाने समाजगीत सादर केले. व्यासपीठावर उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष विठ्ठलतात्या वामने,सरपंच रामनाथ पावसे, शालेय समितीचे सदस्य भाऊ वारुंगसे, विजय दादा वाजे, काशिनाथ वाजे,देणगीदार भगवान वाजे,कारभारी वारुंगसे,दामोदर कुंदे,शंकरराव वामने,माजी सरपंच शरद माळी, अशोकराव गवळी, नामदेव पावसे,वसंतराव जाधव,पुंजा आव्हाड,समीर सय्यद आदी उपस्थित होते.कर्मवीरांच्या जीवन व कार्याचा परिचय प्रिया वाजे,आराध्या वाजे ,निलम सदगीर , स्वरा वारुंगसे ,अनन्या जाधव,स्वरांजली सहाणे या विद्यार्थ्यासह उपशिक्षक रेवणनाथ कांगणे यांनी करून दिला. विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले यांनी प्रास्ताविकात संस्थेचा व कर्मवीरांचा परिचय करून उपस्थितांचे स्वागत केले. एस.एस.सी व एच.एच.सी परीक्षेत पहिल्या १ ते ५ क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांनी दिलेल्या देणगीतून मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.तसेच गरीब, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना गणवेश,दप्तर व कंपास पेटी आदींचे वाटप करण्यात आले.बक्षिसांचे नियोजन व यादी वाचन कचेश्वर शिंदे,सुनिल ससाणे,कल्पना शिंदे,जयश्री गोहाड, रामदास वारुंगसे यांनी केले. यावेळी बोलतांना शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे म्हणाले की ,कर्मवीरांनी स्वतः च्या प्रपंचाचा विचार न करता समाजाच्या प्रपंचाचा विचार करत आपले आयुष्य शैक्षणिक कार्यासाठी वेचले. विद्यार्थ्यांसह इतरांनी कर्मवीरांच्या कार्याचा आदर्श घ्यावा असे आव्हान वाजे यांनी केले. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात जिद्द चिकाटी ठेवल्यास यश निश्चित मिळते. असेही ते म्हणाले. समाजदिनानिमित्त रांगोळी काढणे,पुष्परचना,कबडडी, स्लो सायकल आदिं सह विविध मनोरंजनात्मक खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. सलग दोन दिवस संपन्न झालेल्या स्पर्धेचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला.रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सूत्रसंचालन सोमनाथ गिरी यांनी आभार पर्यवेक्षिका जयश्री पगारे यांनी मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ ,संस्थेचे सभासद ,हितचिंतक , देणगीदार व विद्यार्थी उपस्थित होते.फोटोतील मजकूर-डुबेरे जनता विद्यालयात समाजदिनानिमित्त विद्यार्थी गुणगौरव प्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे, विठ्ठल वामने, सरपंच रामनाथ पावसे,भगवान वाजे,मुख्याध्यापक रंगनाथ उगले व इतर मान्यवर
