
नांदगाव (प्रतिनिधी )
संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित श्री संत सेवालाल महाराज लॉ कॉलेज, वसंतनगर, जातेगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक हे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिले एलएल.बी. महाविद्यालय ठरले आहे.
नाशिक जिल्ह्याचा विचार करता, नाशिक शहर वगळता मालेगाव येथे एक लॉ कॉलेज कार्यरत आहे. मात्र ग्रामीण भागात कायद्याचे शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने वसंतनगर, जातेगाव येथील हे महाविद्यालय एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
हे महाविद्यालय ग्रामीण भागात सुरू करण्याचा मान संस्थेचे मार्गदर्शक एस. जी. राठोड साहेब यांना मिळतो. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या दूरदृष्टीतून त्यांनी अथक प्रयत्न करून यावर्षी पुणे विद्यापीठ (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) अंतर्गत एलएल.बी. पदवी महाविद्यालय मंजूर करून घेतले आहे. यावर्षी एलएल.बी. अभ्यासक्रम सुरू होत आहे.
भविष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे लॉ कॉलेज वरदान ठरणार असून कायद्याच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी दूरवर जाण्याची गरज भासणार नाही.राठोड साहेबांच्या दूरदृष्टीकोनातून व अथक प्रयत्नांतून शिक्षणाची संधी उपलब्ध झाली
ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांना एलएल.बी. अथवा कायद्याच्या शिक्षणासाठी प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
सौ जयश्री जाधव मुख्याध्यापिका
माध्यमिक विद्यालय रोहिले
