
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर यांजकडुन
नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचेसह वरिष्ठ नेत्याचीं धावपळ होईल खरी, पण ज्या गांभीर्याने ते निवडणुक लढवत आहे ते पाहता नरेद्र दराडे हे दुसर्यादां निश्चितच आमदार होणार असे भाकित दहा दिवसापुर्वीच गणतंत्र न्युज नांदगाव या न्युज पोर्टलचे माध्यमातुन प्रतिनिधी नवनाथ गायकर यांनी केले होते.
आज अखेर हे भाकित खरे ठरले आहे.
बंडखोरी करुन वरिष्ठ नेत्याचीं दमछाक करणार्या बंडखोर गीतेनां अखेर मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी समजावल्यानंतर त्यांनी आज अखेर माघार घेतली आहे. यामुळे माजी आमदार नरेंद्र दराडे यांचा दुसर्यादां आमदार होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला.असे झाले तर एकाच वेळी लागोपाठ दोनदा आमदार होण्याचा व ते ही दोन सख्खे बंधु हा विक्रम दराडे बंधुच्या नावावर नोंदला जाणार आहे.
नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकासंदर्भात वार्ताकंन करतानां इतर प्रसारमाध्यमे महायुतीतील बंडाच्या बातम्याबाबत बढा चढाके बातम्या देत असतानां गणतंत्र न्यूज नांदगावचे माध्यमातुन प्रतिनिधी गायकर यांनी संपुर्ण आकलन करत बंडखोरी झालीही तरीही दराडेच पुन्हा विजयी होणार व आमदार होणार अशा बातम्या दिल्या होत्या.हा अंदाज तंतोतत खरा ठरला असुन दिग्गज बंडखोरानीं अखेर तलवारी म्यान केल्या आहेत.
भाजप देशात व राज्यात सतत का जिंकते आहे याचे उत्तर यात आहे. भाजप कोणतीही निवडणुक हलक्यात घेत नाही.चाणक्य नीती प्रमाणे साम, दाम, दंड व भेद वापरुन भाजप विजय अक्षरश; खेचुन आणतो. याचे प्रत्यक्षदर्शी उदाहरण नाशिक मध्ये दिसले आहे.
मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे लाडके संकटमोचक मंत्री ना.गिरीश महाजन व उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदेचें विश्वासु मंत्री ना.उदय सामंत असे दोन दिग्गज दराडेसाठी रिंगणात उतरले होते. या दोन्ही दिग्गजानीं महायुतीच्या बंडखोरानां या नं त्या मार्गे समजावत शांत केले आहे.
राहता राहिले होते ते गीते.त्यांना थेट मुख्यमंत्री महोदयाशी बोलुन शांत करणेत आले आहे.
.या दिग्गजाने माघार घेतल्याने दराडेचां मार्ग मोकळा झाला आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीने लढावु बाणाच त्यागला आहे.या पराभुत मानसिकतेमुळे दिल्ली ते गल्ली विरोधकाचीं फटफजिती होतानां दिसत आहे.
