
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३००२ वा दिवस “तमसो मा ज्योतिर्गमय” हीच आपली प्रार्थना असली पाहिजे. अज्ञानरुपी अंधारातून आपल्याला आशाचे किरण दिसेलच याची खात्री बाळगा. दरिद्री, पिडीत, अज्ञानी, उपेक्षित, अशा कोट्यवधी भारतीय पददलितांच्या उध्दारासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने रात्रंदिवस परमेश्वराकडे प्रार्थना करायला हवी. या पिडीतांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे लागेल. आपण सर्वांनी मिळून देशाच्या आध्यात्मिक व भौतिक शिक्षणाचा भार घेतला पाहिजे. आज तुम्हाला मिळत असलेल्या शिक्षणात काही चांगल्या गोष्टी आहेत खर्या, पण त्यात दोष एवढे भयंकर आहेत की, त्यांच्यामुळे चांगल्या गोष्टी निरुपयोगी ठरत आहेत. मनुष्य निर्माण करणार्या शिक्षणाशिवाय राष्ट्राचे पुनरुत्थान होणे शक्य नाही. अकारणात्मक वा निषेधप्रधान शिक्षण हे मृत्यूहून अधिक वाईट असते ते आपण टाळले पाहिजे. *स्वामी विवेकानंद…*

जागतिक फोटो ग्राफी दिनाच्या नांदगाव फोटो असोसिएशन ला गणतंत्र न्यूज तर्फे हार्दिक शुभेच्छा!!
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर २८ श्रावण (नभमास) शके १९४७*
★ श्रावण कृष्ण /वद्य ११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. १९ ऑगस्ट २०२५
★ अजा एकादशी 🚩🚩🚩🚩🚩
★ मंगळा गौरी पूजन
★ १९१८ काँग्रेस नेते, भारताचे नववे राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांचा जन्मदिन.
★ १९७५ शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक विश्वनाथ तथा अप्पासाहेब पेंडसे यांचा स्मृतीदिन
★ जागतिक छायाचित्रण दिन.*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
