
ओझर:(प्रतिनिधी )दि १९( वार्ताहर) ‘बहुजन हिताय,बहुजन सुखाय’ येथील ‘मविप्र’ संस्थेच्या माधवराव बोरस्ते विद्यालयात संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब यांच्या जयंतीनिमित्त दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन अनुक्रमे कर्मवीर रावसाहेब थोरात कर्मवीर काकासाहेब वाघ कर्मवीर भाऊसाहेब हिरे कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे कर्मवीर गणपत दादा मोरे कर्मवीर डी आर भोसले कर्मवीर बाबुरावजी ठाकरे कर्मवीर विठ्ठलराव हांडे कर्मवीर डॉ वसंतराव पवार प्रमुख अतिथी मविप्रचे माजी सभापती माणिकराव बोरस्ते, महिला संचालिका शोभा बोरस्ते माजी सरपंच पार्वताबाई शिंदे सर्व सदस्य मुख्याध्यापक सोपान वाटपाडे अभिनवच्या मुख्याध्यापिका वनिता शिरसाठ उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

प्रारंभी शालेय प्रांगणात संस्थेच्या ध्वजाचे पूजन व ध्वजरोहन माणिकराव बोरस्ते यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी गीतमंचाने राष्ट्रगीत व समाजगीत सादर केले. स्काऊट गाईड पथकाने संचालन करून कर्मवीरांना मानवंदना दिली. समाज दिनानिमित्त आदर्श महिला पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते मंगल सावंत व ग्रंथपाल अनिता भंडारे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. रांगोळी व पुष्परचना स्पर्धेचे उद्घाटन करून प्रथम व द्वितीय बक्षिसाची निवड करण्यात आली. प्रास्ताविक मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी केले. अध्यक्षस्थानी माणिकराव बोरस्ते होते. प्रारंभी गीतमंच व संगीत शिक्षिका शितल आहेर यांनी स्वागतगीत ईशस्तवन सादर करून अतिथींचे स्वागत केले. अतिथींचा सत्कार शालेय समितीच्या वतीने करण्यात आला.रांगोळी व पुष्परचना स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांकाने यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कर्मवीरांच्या जीवन कार्यावर विद्यार्थी देवेश लड्डा याने भाषण केले.अतिथी मनोगत संचालिका शोभा बोरस्ते ओझरच्या माजी सरपंच पार्वताबाई शिंदे यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात माणिकराव बोरस्ते यांनी बहुजन समाजासाठी झटणाऱ्या सर्व कर्मवीरांच्या जीवन कार्यावर माहिती देऊन त्यांना अभिवादन केले. व्यासपीठावर सदस्य पुंडलिक गवळी नामदेव चौधरी लक्ष्मण चौधरी धोंडीराम पगार भास्कर तासकर बाळासाहेब कदम शिवाजी गायकवाड जगदीश उगले नितीन पगार उपस्थित होते.फलक रेखाटन मोनाली निकम मोहन क्षीरसागर वर्षा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र डेरले शितल हांडोरे हेमंत भट यांनी केले. आभार अभिनवच्या मुख्याध्यापिका वनिता शिरसाठ पाटील यांनी मानले.
