
सिन्नर – (प्रतिनिधी). इंग्रजी दिनानिमित्त चांडक कन्या विद्यालयात इयत्ता 5 वी ते 10 वींसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. तब्बल 50 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवून इंग्रजीतील आत्मविश्वास, स्पष्ट उच्चार व विषय मांडणीचे प्रभावी दर्शन घडवले. परीक्षक म्हणून उपस्थित सौ. निर्मला आहेर यांनी विद्यार्थिनींच्या वक्तृत्वकौशल्याचे मनापासून कौतुक केले. अंतिम फेरीत 14 विद्यार्थिनींनी चमकदार यश संपादन करून पारितोषिके पटकावली.या स्पर्धेस मुख्याध्यापिका सुनिता कर्डिले, शालेय समिती अध्यक्ष ॲड. श्रीराम क्षत्रिय, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे व शिक्षक प्रतिनिधी उत्तम भोये यांचे मार्गदर्शन लाभले. पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे यांनी प्रास्ताविक केले, तृषाली बोडके यांनी सूत्रसंचालन तर वैशाली दातीर यांनी आभार मानले. स्पर्धेचे सुयोग्य नियोजन इंग्रजी विषयाच्या शिक्षिका तृषाली बोडके, उमा लोकरे, अलका वाघ, प्रतिभा वाढवणे व वैशाली दातीर यांनी केले.🌸 इंग्रजी दिनानिमित्त घेण्यात आलेली ही स्पर्धा विद्यार्थिनींच्या भाषिक कौशल्य व आत्मविश्वास वृद्धीची महत्त्वपूर्ण पर्वणी ठरली.
