
नांदगाव (प्रतिनिधी ) दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी समाजक्रांती राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला. बी. एस.एफ. बहुउद्देशीय संस्था अमरावती उपेक्षित नायक न्यूज व संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित समाजक्रांती पुरस्कार सोहळ्यात नाशिकचे पत्रकार म्हणून नावलौकिक असलेले डॉक्टर श्याम जाधव यांना समाजक्रांती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉक्टर श्याम जाधव हे माय माऊली न्यूजचे संपादक असून माय माऊली शिवशक्ती फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष असून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. यावेळी अनेक फिल्म स्टार, रिंग स्टार, निर्माते, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री यांच्या उपस्थितीत संस्थापक अध्यक्ष भूषण सरदार यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 17 ऑगस्ट ऐतिहासिक दिवस निमित्त राष्ट्रसंत स्वच्छतेचे जनक गाडगेबाबांच्या पुण्य पावन भूमी अमरावतीमध्ये समाजक्रांती पुरस्कार सोहळा पार पडला. यास संबंध विश्वाला ज्यांनी स्वच्छता चा महामंत्र दिला. अजान अंधश्रद्धा, निरक्षरता यावर जन प्रबोधन केले. समाजाचे उत्खनन करून समाज प्रबोधन जागृती केली. असे महान संतश्रेष्ठ आदरणीय गाडगेबाबांच्या छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत कबीर महाराज अशा विविध महापुरुषांच्या पावनराष्ट्रात हा सोहळा संपन्न झाला.
