
गावदरा ( प्रतिनिधी) आज 15 ऑगस्ट 2025 रोजी गावदरा या वस्तीवरील सर्व ग्रामस्थ व महिला वर्गांनी एक नवीन आदर्श घडवून आणला ह्या वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावदरा ता. नांदगाव जि. नाशिक या शाळेतील मुख्याध्यापक श्री विलास सोनवणे यांना सर्व ग्रामस्थांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याच वेळी युवा प्रशिक्षणार्थी श्रीमती हर्षदा शिवदे या मॅडम यांना देखील उत्कृष्ट कार्याबद्दल आदर्श शिक्षिका म्हणून सन्मानित करण्यात आले. श्री विलास सोनवणे यांचे कार्य पंचक्रोशीतच नव्हे तर राज्यभरात ओळखले जातेय.त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळेसाठी लाखाच्या घरात मदत आलेली आहे त्यांच्या ह्या उत्कृष्ट कार्याबद्दल समस्त गावदरा वस्तीवरील महिला तसेच जेष्ठ गावकरी यांनी त्यांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कृत केले. श्री विलास सोनवणे हे वस्तीवर 2023 ह्या वर्षी हजर झाले तेव्हा पासून मुलांमध्ये जो बदल घडून आला तो ह्या पालकांना जाणवत आहे. त्यात विद्यार्थ्यांचे राहणीमान,अभ्यासाची गोडी, विद्यार्थी पटसंख्या, खाजगी शाळेत नसेल त्या सुविधा असे अनेक नवोपक्रम ह्या शिक्षकांनी ह्या दोन तीन वर्षात घडवून आणले आहेत.त्यांनी देश विदेशातून जी मदत मिळवली त्यामुळे हा बदल करणे शक्य झाले आहे. श्रीम. हर्षदा शिवदे ह्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आहेत परंतु त्यांचे कार्य एखादे नियमित शिक्षकांपेक्षा कमी नाही त्यांच्या ह्या सात आठ महिण्याच्या कालावधीत खूप उल्लेखनीय कामे केलेत. त्यांनी श्री विलास सोनवणे यांच्या सोबत शाळा बदलासाठी खूप मोलाचे सहकार्य केले त्याच उत्कृष्ट कामगिरी बद्दल समस्त गावकरी गावदरा यांनी त्यांना ही आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कृत केले. ह्या कार्यक्रमाच्या वेळी परिसरातील सर्व ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार देताना ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा उल्लेखनीय होता.सर्वांच्या मुखातून ह्या शिक्षकांचे गुणगान ऐकायला येत होते. ह्या कार्यक्रमावेळी शालेय व्यवस्थापन समिती गावदरा यांचे विशेष सहकार्य लाभले.हा प्रसंग पाहून जि. प. शाळा गावदरा येथील शिक्षक भारावून गेले.हा पुरस्कार दिल्याबद्दल सर्व महिला मंडळ व ग्रामस्थ यांचे श्री विलास सोनवणे व हर्षदा शिवदे मॅडम यांनी आभार मानले.हा पुरस्कार मला नेहमी प्रेरणा देत राहील व अजून नवनवीन उपक्रम कारण्यास प्रेरित करीत राहील. हा पुरस्कार राज्यस्तरीय किव्हा राष्ट्रस्तरीय पुरस्कारापेक्षा कमी नाही असे विलास सोनवणे यांनी गावाकऱ्यांनी बोलून दाखवले.
