
नांदगाव : (प्रतिनिधी ) सी.व्ही.रमण बालवैज्ञानिक कार्यशाळेचे आयोजन राहुरी कृषी विद्यापीठ येथे नुकतीच पार पडली यात हेमांगी दोंड ही राज्यात तिसरी आली. ती व्ही.जे.हायस्कूलची विद्यार्थिनी आहे . या विद्यार्थीनींने सी.व्ही.रमण बालवैज्ञानिक कार्यशाळेत मिळविले घवघवीत यश मिळविले आहे. जनसेवा प्रतिष्ठान अहिल्यानगर संचलित सर डॉ. सी व्ही रमन बालवैज्ञानिक कार्यशाळेद्वारे १३ एप्रिल २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बालवैज्ञानिक परीक्षेत ज्यांनी उज्वल यश संपादन केले,त्यांची या कार्यशाळेसाठी निवड करण्यात आली होती या कार्यशाळेसाठी राज्यभरातील विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते या कार्यशाळेतून तालुका ,जिल्हा व राज्य स्तरावर विद्यार्थांची निवड करण्यात आली यात त्यांना पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे संपन्न झाले. या परीक्षेत व्ही.जे. हायस्कूल या शाळेची विद्यार्थिनी कु.हेमांगी प्रमोद दोंड हिने राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले.तसेच कु. नक्षत्रा विक्रम घुगे हिचा नाशिक जिल्ह्यातून तिसरा क्रमांक व रिशिता शैलेश टिळेकर हिने तालुक्यात प्रथम क्रमांक त्याबद्दल या विद्यार्थीनींचे हार्दिक अभिनंदन केले जात आहे.
