
मनमाड (प्रतिनिधी ) आदर्श इंग्लिश मेडीयम स्कूल मनमाड,येथे बालगोपाळाचा दहीहंडी उत्सव आनंदात साजरा नाशिक मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मेडीयम येथे श्रीकृष्ण अष्टमी आनंदात साजरी करण्यात आली.दहीहंडी चे पूजन शाळेचे मुख्याध्यापिका धात्रक मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. मोठया विद्यार्थ्यांनी दहीहंडी सजावट केली तर लहान वयोगटातील विद्यार्थी कृष्ण – राधा, गोपिका, सुदामा, पेंडया वेषात आले सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचा शहभाग होता.

विदयार्थ्यांनी गाणी,गवळणी,नाटक सादर केली.आहेर. एस. आर. यांनी विध्यार्थ्यांना माहिती दिली. व गोपाळकाला चे महत्व पटवून दिले.कृष्णा अष्टमी निमित्त चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. लाह्या – पोह्याचा – दहीचा प्रसादाचा आनंद मनसोक्त आस्वाद विदयार्थ्यांनी घेतला. जणू काही गोकुलमय वातावरण निर्मिती आदर्श शाळेला आली.सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

