
बोलठाण (प्रतिनिधी) नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण गावापासून ते पेट्रोल पंपापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. मात्र या रस्त्यावर साईट पट्ट्या व्यवस्थित न भरल्याने दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी रविवारी सकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास लक्झरी बस सरकली असून दुर्घटना टळली आहे. तरी या रस्त्याच्या कडेला व्यवस्थित मुरूम टाकून धरण्यात यावा अशी मागणी समोर येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील बोलठाण पासून ते पेट्रोल पंपापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण काम करण्यात आले आहे अजून एक वर्ष देखील झालेले नाही असे समजते. सदरचे काम ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट पद्धतीने केले असून याकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग नांदगाव व संबंधित विभागाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी रविवारी लक्झरी बस सरकल्याने दिसून येत आहे. येथील काही नागरिकांनी सदरचे काम सुरू असताना वेळोवेळी फोटो देखील सोशल मीडियावर टाकले होते तरी देखील संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही.

त्यातच दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी रविवारी सकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास या रस्त्याने लक्झरी बस जात असताना व सदरचा रस्ता अरुंद असल्याने गाडी या रस्त्याने निघत नसल्याने या रस्त्यावर बोलठाण गावातील जकात नाक्याजवळ रस्त्यावरून एका बाजूला लक्झरी बस सरकली. जर लक्झरी बस या रस्त्याने पलटी झाली असती तर मोठी जीवित हानी झाली असती. आणि या जीवितहानीला जबाबदार कोण राहिले असते असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. तरी संबंधित विभागांचे अधिकाऱ्यांनी त्या रस्त्याबाबत लक्ष घालून या रस्त्यावर साईड पट्ट्या व्यवस्थित करून घ्याव्यात अशी मागणी होत आहे. कुणी आवाज उठवला तर त्याच्यावर दबाव टाकला जातो असे देखील काही नागरिकांचे मत आहे.
