
मखमलाबाद विद्यालयात गोपाळकाला दहीहंडी निमित्त श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य रावसाहेब उशीर,पर्यवेक्षक संजय हांडगे याप्रसंगी सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे दहीहंडी गोपाळकाला सण अतिशय भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा केला.प्राचार्य संजय डेर्ले, उपप्राचार्य रावसाहेब उशीर, पर्यवेक्षक संजय हांडगे यांच्या शुभहस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.कु.प्रज्योत सोनवणे याने कृष्णाची वेशभूषा केलेली होती.कु.आराध्या मेहंदळे व ज्येष्ठ शिक्षिका रूपाली शिंदे यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीची विद्यार्थ्यांना माहिती दिली.श्रीकृष्णाचे जीवनकार्य व मैत्रीचे नाते सांगितले.कु.शर्वरी सानप कु.साक्षी काकड कु.श्रावणी चौगुले,कु.त्रीसंध्या वाघमारे,उपशिक्षिका मुक्ता कमानकर,योगिता कासार,संगीत शिक्षक तुकाराम तांबे व गीतमंच यांनी अतिशय सुंदर अशा गवळणी सादर केल्या.कु.कोमल रोकडे,कु.दिव्या शेवरे,कु.संतोषी सूर्यवंशी,कु.प्रीती गायकवाड, कु.रोशनी धूम यांनी अतिशय सुंदर असे “राधा” या गाण्यावरती नृत्य सादर केले.तसेच इयत्ता ७वीच्या विद्यार्थिनींनी “कान्हा सो जा जरा” या गाण्यावरती नृत्य सादर केले.इयत्ता ७ वी व ८वी च्या विद्यार्थ्यांनी थरावर थर रचून अतिशय भक्तिमय वातावरणात व उत्साहपूर्ण आनंदात दहीहंडी फोडली.याप्रसंगी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी नृत्याचा आनंद घेतला

.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.ज्ञानेश्वरी काकड,ज्येष्ठ शिक्षिका प्रमिला शिंदे,रूपाली शिंदे व आभार प्रदर्शन काव्या साठे,ज्येष्ठ शिक्षिका प्रमिला शिंदे यांनी केले.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका अनुपमा पवार,कल्पना देशमाने,अर्चना टर्ले,अश्विनी पाटील,चैताली मोगल,पल्लवी पगार,मुक्ता कमानकर यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
