
मनमाड (प्रतिनिधी)शालेय शिक्षण व क्रीडा विभाग नांदगाव तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा आज दिनांक १६/०८/२०२५ रोजी मनमाड येथे संपन्न झाल्या. यात लोकनेते कै.ॲड.विजय शिवराम आहेर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज नायडोंगरी या विद्यालयातील *१४ वर्ष वयोगटात* १) प्रताप संदीप आयरेकर (३५ kg ) व २) साईनाथ वाल्मीक निस्ताने (४८ kg) वजनी गटात ०२ विद्यार्थ्यांनी *प्रथम क्रमांक* मिळवून नांदगाव तालुक्यातून *नाशिक जिल्हा स्पर्धेसाठी त्यांची निवड झालेली आहे* .१७ वर्ष वयोगटात १) तुषार जानकीराम जोमदे ( ४८ kg ) याने *द्वितीय क्रमांक* पटकावला. तर २)आकाश नाना जोमदे ( ४५ kg ) याने *तृतीय क्रमांक* पटकावला. विद्यालयातून ४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या चारही विद्यार्थ्यांनी कुस्ती क्रीडा स्पर्धेमध्ये दैदीप्यमान कामगिरी करून संस्था व विद्यालयाचे नाव उज्वल केले त्याबद्दल सदर विद्यार्थी व *क्रीडा शिक्षक श्री राजेंद्र मारणे सर* यांचे कै.शिवराम वेडूजी पाटील शिक्षण प्रसारक नायडोंगरी या संस्थेचे सरचिटणीस मा. विलासभाऊ विजय आहेर व संस्थेचे पदाधिकारी तसेच विद्यालयाच्या प्राचार्या सौ. पल्लवी विलासराव आहेर, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवक वर्ग यांनी अभिनंदन केले.
