
मातोश्री हौसाबाई दुसाने पतसंस्थेचे ध्वजारोहण करताना संस्थेच्या व्हा. चेअरमन ज्योती शिरसाट समवेत चेअरमन वैशाली दुसाने,महिला संचालिका व कर्मचारी (फोटो- संदीप शिरसाट विंचूर (निफाड)
विंचूर दि.१५(प्रतिनिधी)भारतीय स्वातंत्र्य दिन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.७९ व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने येथील शैक्षणिक, सामाजिक, सहकारी संस्थांच्या वतीने राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.
विंचूर ग्रामपालिका विंचूर ग्रामपालिकेचे ध्वजारोहण
सरपंच सचिन दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच प्रविण चव्हाण,सदस्य दत्तात्रय व्यवहारे, संतोष जाधव, राजेंद्र मोरे, सुवर्णा गोरे,विलास गोरे, रमेश बोराडे, मुख्य लिपिक राजेंद्र शिंदे, दत्तात्रय खाडे, मिलिंद वाघ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
विंचूर पोलीस चौकी
विंचूर पोलीस चौकीचे ध्वजारोहण पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पोलीस हवा.बाळासाहेब कांदळकर , पोलीस कॉं.सागर आरोटे,गणेश साळूंके,शुभम तळेकर आदी उपस्थित होते धनसंपदा पतसंस्था धनसंपदा पतसंस्थेचे ध्वजारोहण संस्थेचे चेअरमन अँड संजय दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्हा.चेअरमन दत्तात्रय सोमवंशी संचालक अविनाश दुसाने, संतोष उशीर,सतिष सांगळे,कैलास भालेराव, चंद्रकांत साईनकर,संजय झाल्टे,सचिन देशमुख, संदीप शिरसाट,सुनिल कानडे, व्यवस्थापक संदीप पवार आदी उपस्थित होते.
मातोश्री हौसाबाई दुसाने महिला पतसंस्था
मातोश्री हौसाबाई दुसाने पतसंस्था व मातोश्री हौसाबाई दुसाने वाचनालयाचे ध्वजारोहण संस्थेच्या व्हा.चेअरमन ज्योती शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेच्या चेअरमन वैशाली दुसाने, संचालक ज्योती कानडे, स्मिता खांदोडे, व्यवस्थापक ऋषिकेश जोशी आदी उपस्थित होते.
चंपालालजी भट्टड पतसंस्था
चंपालालजी भट्टड पतसंस्थेचे ध्वजारोहण कृष्णा कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे संचालक सुरज भट्टड, अनिल झडप, सुवर्णा गोरे, दिप्ती पुंड, शेखर लोळगे,महेंद्र पुंड, जयंत साळी, अशोक भट्टड, मनोज भट्टड, दिलीप बोथरा, योगेश कायस्थ, सुनिल बागले, जगन्नाथ जोशी, संगिता सोनवणे, अविनाश कदम आदींसह अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
न्यू ब्लॉसम्स् इंग्लिश मिडीयम स्कूल
न्यू ब्लाँसम्स् इंग्लिश मेडीयम स्कूलचे ध्वजारोहण संस्थेचे संचालक सतिष सांगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय दरेकर, उपाध्यक्ष संतोष उशीर, सचिव अविनाश दुसाने, संचालक चंद्रकांत साईनकर, कैलास भालेराव, संजय झाल्टे, संदिप शिरसाट, सुनिल कानडे,शंतनु कोथमिरे, प्राचार्या ज्योती माठा, मुख्याध्यापिका पुजा निकम, समन्वयक संगिता जगताप आदींसह विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे ध्वजारोहण स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष जगदीश जेऊघाले यांच्या हस्ते करण्यात आले.तर स्काऊट गाईडचे ध्वजारोहण उपाध्यक्ष कैलास सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ, सदस्य पंढरीनाथ दरेकर,अनिल दरेकर, विंचूर ग्रामपालिकेचे सरपंच सचिन दरेकर, उपसरपंच प्रविण चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे, प्राचार्य नंदकुमार देवढे, उपमुख्याध्यापक सुरेश वाबळे, पर्यवेक्षक सुदाम माळी,प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका नीलिमा शिरसाठ, अशोक दरेकर, निरज भट्टड, पी के जेऊघाले,प्रविण ढवण, दत्तात्रय व्यवहारे, शंकरराव दरेकर, विनायक जेऊघाले, राजेंद्र मोरे, संजय शेवाळे, के. के.जेऊघाले ,राजेंद्र गोरे,किरण नवले, आबासाहेब दरेकर,ज्ञानेश्वर शिरसाठ,राजेंद्र चांदे, सुनिल नेवगे, सतिश शेलार, वसंत दरेकर,निलेश बोथरा,हरीश कांगणे,भागवत दरेकर, स्नेहल साळी, सोनाली कापडणीस मीरा दरेकर, मालती जाधव, स्वाती धात्रक आदींसह विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
