
नांदगाव(प्रतिनिधी ) कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची जयंती ‘महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.यु.पाटील यांनी कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. यु. पाटील यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य व क्रीडा संचालक प्रा.डी.एम. राठोड यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र क्रीडा दिन साजरा करण्याची पार्श्वभूमी विशद केली व भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये कुस्ती खेळ प्रकारात पहिले वैयक्तिक ऑलम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी दिलेल्या योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची जयंती महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरी केली जाते यासंदर्भात माहिती दिली. याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. लोकेश गळदगे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचे प्रमुख प्रा.पी.एम.आहेर, कला व वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख प्रा.जी.व्ही.बोरसे, राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के.पवार, महाविद्यालयातील प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारीवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
