
सिन्नर.(प्रतिनिधी) सिन्नर नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा.श्री.विठ्ठलराजे उगले तसेच नगरसेवक मा.श्री.सागर भाटजिरे (गटनेता), मा.श्री.पंकज जाधव, सिन्नर तालुक्याचे भाग्यविधाते आमदार मा.श्री. माणिकराव कोकाटे यांचे स्वीय सहाय्यक शिवा वाणी आणि अभियंता मा.श्री.प्रशांत पवार यांनी सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक संकुलास सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान मान्यवरांनी संकुलातील शैक्षणिक, भौतिक, सांस्कृतिक व विद्यार्थी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी संस्था करीत असलेल्या शैक्षणिक कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
`नगराध्यक्ष मा.श्री.विठ्ठलराजे उगले यांनी शिक्षण संस्था आपली असून या संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपालिकेच्या स्तरावर आवश्यक ते सहकार्य व पाठबळ देण्याचे आश्वासन दिले. शिक्षण, पायाभूत सुविधा व विद्यार्थी कल्याणाशी संबंधित विषयांमध्ये संस्थेच्या मागण्या सकारात्मकपणे विचारात घेतल्या जातील, असा शब्द त्यांनी यावेळी दिला.`
संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री नामदेव लोणारे यांनी संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक व विद्यार्थी विकासाशी संबंधित कामकाजाची माहिती दिली. ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. यावेळी सिन्नर नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांना त्यांच्या कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. शहराच्या व शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे नेतृत्व मोलाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री. नामदेव लोणारे, संचालक मा.श्री.संदीप गवळी, मा.श्री.मनोज महात्मे तसेच संकुलाचे प्राचार्य श्री. मधुकर देशमुख आणि संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नगरपालिकेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी संकुलाच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
