
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१५१ वा दिवस
पारमार्थिक गुरूने साधकामधे संक्रामित केलेल्या ज्ञानापेक्षा अधिक उच्च आणि अधिक पवित्र असे काहीही नाही. जर एखादा मनुष्य पूर्ण योगी झालेला असेल, तर त्याला ह्या ज्ञानाची प्राप्ती आपोआपच होते. ती ग्रंथांतून होऊ शकत नाही. तुम्ही जरी जगाचे चारही कोपरे धंडाळले किंवा हिमालय, आल्प्स, कॉकेशस हे पर्वत किंवा गोबीचे अथवा साहाराचे वाळवंट किंवा समुद्राचा तळ या सर्व ठिकाणी जरी शोध केला, तरी ते ज्ञान तुम्हाला गुरू भेटेपर्यंत कदापि लाभणार नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष २५ शके १९४७
★ पौष वद्य /कृष्ण १२
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. १५ जानेवारी २०२६
★किक्रांत, करीदिन
★ १९२६ भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन
★ १९२९ अमेरिकेतील नागरी अधिकार चळवळीचे नेते डॉ. मार्टिन ल्युथर किंग यांचा जन्मदिन
★ १९४९ जनरल करिअप्पा यांनी ब्रिटीशांकडून भारतीय सेनेची सूत्र हाती घेतली.
★ भारतीय सशस्त्र सेना दिन.
