
सिन्नर ( प्रतिनिधी ) १४ जानेवारी २०२६ द माउंटन मॅन दशरथ मांझी यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले

या कार्यक्रमाची सुरुवात द माउंटन मॅन दशरथ मांझी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की दशरथ मांझी यांनी प्रेमाची एक आगळी-वेगळी व्याख्या करत प्रेमाला सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवले आहे. एखाद्या गोष्टीवर किती निस्वार्थ आणि जिद्दीने प्रेम करता येऊ शकते, याचं उदाहरण मांझींनी जगासमोर ठेवलं आहे. दशरथ मांझी हे एक गावातील एका जमीनदार व्यक्तीकडे कामाला होते त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. त्यानंतर डोंगराच्या त्याबाजूने कामाला होते. त्यांची पत्नी फगुनिया दररोज त्यांच्यासाठी जेवण घेऊन जात असे. एकेदिवशी जेवण घेऊन जाताना फगुनियाचा तोल गेला आणि ती डोंगरावरून खाली कोसळली. यानंतर काही दिवसांनी तिचं निधन झालं. घटनेनंतर दशरथ मांझी अनेक दिवस कामावर गेले नाहीत. ते विचार करायचे डोंगराऐवजी जर याठिकाणी रस्ता असता तर रुग्णालयात जाण्यासाठी सहज शक्य झाले असते ही अशी वेळ परत कोणावर येऊ नये म्हणून त्यांनी डोंगर फोडून रस्ता बनवायचं त्यांनी ठरवलं आणि छिन्नी हातोडा घेऊन डोंगर फोडायला सुरुवात केली मांझी यांनी १९६० ते १९८२ पर्यंत तब्बल २२ वर्ष कठोर मेहनत घेऊन २५ फूट उंच, ३० फूट रुंद आणि ३६० मीटर लांबीचा डोंगर तोडून रस्ता बनवला. लोक त्यावेळी दशरथ यांना पागल म्हणायचे. मात्र, पत्नीच्या प्रेमासाठी त्यांनी हे कठोर काम पूर्ण केले. दशरथने गया जिल्ह्यातील अत्री आणि वजीरगंज ब्लॉकमधील प्रवास ५५ किमी (३४ मैल) वरून १५किमी (९.३ मैल) पर्यंत कमी केला. त्यांच्या कार्याची ओळख मिळवण्यासाठी त्यांनी नवी दिल्लीला प्रयाण केले आणि बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते त्यांना बक्षीस मिळाले . २०१६ मध्ये भारतीय पोस्टने मांझी दर्शविणारे टपाल तिकीट जारी केले .
मांझी यांना पित्ताशयाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि २२ जुलै २००७ रोजी त्यांना नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ( एम्स ) मध्ये दाखल करण्यात आले. तेथे १७ ऑगस्ट २००७ रोजी त्यांचे निधन झाले. बिहार सरकारने त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले.दशरथ मांझी यांची प्रेरणा आज समाजाने घेतली पाहिजे.अशा या द माउंटन मॅन दशरथ मांझी यांना विनम्र अभिवादन!
या कार्यक्रमाचे सुञसंचलन अजित सोनवणे यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार रोशन नागरे यांनी मानले
याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे अजित सोनवणे शंकर केदार रोशन नागरे मनोहर सोनवणे बाळासाहेब मुठे संदिप मुठे रोहित मुठे शाम डांगे भडांगे कुणाल भडांगे सचिन चौरे ज्ञानेश्वर जाधव दिलीप मोरे अभिशा वायचळे अंकित मुठे आदि.उपस्थित
