
नांदगाव (प्रतिनिधी )कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय युवक सप्ताह’ अंतर्गत प्रा.गोकुळ बोरसे यांचे ‘व्यक्तिमत्व विकास व युवक प्रबोधन’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.यु.पाटील मंचावर उपस्थित होते.
प्रा गोकुळ बोरसे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांची सविस्तर माहिती दिली व त्या गुणांचा विद्यार्थ्यांनी अंगीकार करण्याचे आवाहन याप्रसंगी केले

. आदर्श व्यक्तिमत्त्वाची जडणघडण ही दैनंदिन जीवनातील कौटुंबिक व सामाजिक आंतरक्रियांमधील लहानसहान प्रसंगांमध्ये आपण आपले वर्तन कसे ठेवतो यावर ठरत असते. म्हणून संयम, सचोटी, आत्मविश्वास,सत्यता, खिलाडूवृत्ती,प्रामाणिकपणा इ. सद्गुण आपल्या अंगी बाळगण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन याप्रसंगी केले. सदर प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डी.एम.राठोड, प्रा.एस.जी.पवार, प्रा.आर.डी. पाटील व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के.पवार यांनी केले.
