
वाखारी ( प्रतिनिधी) आज दिनांक 12 जानेवारी 2026रोजी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथील हिंदी विभागा तर्फे वखारी गावतील हिंदी विषयांचा वापर , महत्व भाषेची आवश्यकता याविषयीची माहिती जमा केली. कु रोशन सरोदे, क गौरी सोनवणे कु पूजा सांवत, कु. गायत्री शैवाळे, खोडके विशाल माधुरी भोकनळ मोठया संख्केने हिंदी विभागाचे सहभागी झाले होते, विद्यार्थ्यांना प्रा. अनील राठोड यांनी सखोल प्रश्नावली तयार करून आलेली होती.विभाग प्रमुख डॉ भारती धोंगडे विद्यार्थ्यांना हिंदी विभाग, यांनी मार्गदर्शन केले. या सर्वेक्षण करण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.. एन. यू. पाटील सर महत्त्वपूर्ण सूचना करून सदरच्या सर्वेक्षणाचा अहवाल महाविद्यालयात सादर करावा व संकलित माहितीच्या आधारावर विद्यार्थ्यांचे हिंदी विषयाचे ज्ञान वाढवण्यासाठी विभागाने प्रयत्न करावे असे मार्गदर्शन केले.

या सर्वेक्षण प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस. ए. मराठे कॉर्डिनेटर आटोळे यांची मोलाचे सहकार्य लाभले .या सर्वेक्षणात वखारी गावातील माध्यमिक विद्यालयाचे नाव किसान माध्यमिक विद्यालय कसे असा प्रश्न मुख्याध्यापक श्री अहिरे यांना विचारले असता त्यांनी ही रोचक माहिती दिली.विद्यालय निर्मिती प्रसंगी सर्व ग्रामस्थांची अशी इच्छा होती की शेतकऱ्यांच्या मुलांसाठीची ही शाळा शेतकरी विद्यालय असे असावे तसेच या विद्यालयासाठी किसन नावाच्या व्यक्तीची ही जमीन असल्याकारणाने किसन आणि शेतकरी या शब्दांचा सुवर्णमध्य साधत या विद्यालयाचे नाव ‘किसान माध्यमिक विद्यालय’ असे ठेवण्यात आले अशा प्रकारच्या ऐतिहासिक लोककथा विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणातून शोधल्या.
