
वाखारी (ता. नांदगाव) येथे मविप्र समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विशेष शिबिराचा समारोप मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या समारोप कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री देवाजी यादवराव चव्हाण, श्री लक्ष्मण नारायण काकळीज, श्रीमती अनिता संजय काकळीज (उपसरपंच), श्री विजय काकळीज (अध्यक्ष, स्था.व्य.स. न्यू इंग्लिश स्कूल, नांदगाव), श्री मनिष आण्णासाहेब चव्हाण (माजी सैनिक) तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. इजि. अमित उमेदसिंग बोरसे पाटील (संचालक, मविप्र नांदगाव) होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी “श्रमदान हे सर्वश्रेष्ठ दान असून श्रमाची प्रतिष्ठा जपली पाहिजे” असे मौलिक विचार मांडले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. यु. पाटील यांनी शिबिरातील अनुभव म्हणजे आयुष्यभराची शिदोरी असल्याचे प्रतिपादन केले. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एम. आहिरे यांनी शिबिराचा सविस्तर अहवाल सादर केला. यावेळी भारत देवरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून स्वप्नील चंद्रकांत निकम, तेजस्वीनी प्रल्हाद काकळीज तसेच विलास आहेर व गोरख काकळीज (मामा) यांचा सत्कार करण्यात आला. स्वयंसेवकांनी शिबिरातील अनुभव कथन करून उपस्थितांना प्रेरणा दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील चंद्रकांत निकम यांनी तर आभार प्रदर्शन साक्षी सोमासे यांनी केले.याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. ए. मराठे, भूगोल विभाग प्रमुख व सिनेट सदस्य प्रा. सी. बी. निगळे, आयक्यूएसी समन्वयक प्रा. एम. बी. अटोळे, प्रा. डॉ. किरणकुमार, डॉ. आर. झनकर, डॉ. एस. एस. शेंडगे, प्रा. आर. व्ही. वाघ, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. डी. ठाकरे, प्रा. श्रीमती पी. डी. पाटील, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
