
नागराज मंजुळे, संदिप कर्णिक, विलास बडे, वारे गुरूजी, शेटे यांचा समावेश नाशिक ता. १४ गिरणा गौरव प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणारा २७ वा गिरणा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, यंदाच्या पुरस्कारासाठी चित्रपट दिग्दर्शक व निर्माते नागराज मंजुळे तसेच नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे ब्रिद घेऊन नाशिकची सुरक्षा यंत्रणा बळकट करणारे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारितेचा आधार देऊन न्याय देणारे न्यूज १८ मराठी चे पत्रकार विलास बडे, जिल्हा परिषद शाळा जागतिक पातळीवर घेऊन जाणारे आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या सह सहा विभुतीना गिरणा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. या पुरस्कारांमध्ये नागराज मंजुळे (सातारा) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (नाशिक) विलास बडे (मुंबई) दत्तात्रय वारे (पुणे) सहकार महर्षी श्रीराम शेटे ( दिंडोरी) लोकसेवा प्रकाश दायमा (निफाड) समाजसेवक मुक्तेश्वर शेट्टीवर (नाशिक) आदर्श ग्रामसेवा वर्षा ठाकरे (धुळे) योगगुरु प्रज्ञा पाटील (नाशिक) समाजसेवक प्रकाशचंद्र सोनाग्रा (सटाणा) आदर्श शिक्षणसेवा शैलेद्र सोनजे (मालेगाव) समाजसेवक रतन चौधरी( सुरगाणा) यांची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली महाकवी कालिदास कला मंदिरात येत्या पाच एप्रिल रोजी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली. निवड समितीच्या बैठकीत या पुरस्कार्थीच्या नावांची घोषणा करण्यात आली. मानपत्र स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे २७ वे वर्ष असून, यात प्रामुख्याने सामाजिक, साहित्य, शैक्षणिक, सहकार, कला, संगीत आदी क्षेत्रात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंताना हा उत्तर महाराष्ट्राचा मानाचा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यंदा या पुरस्कारासाठी शिवराज नरवडे,विद्यानंद पाटील,भगवान गायकवाड, भाऊसाहेब राजोळे, अनिल निकम, अशोक पाटील, या समितीने पुरस्कार्थीची निवड केली.
