
सिन्नर ( प्रतिनिधी ) १४ जानेवारी २०२६ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन महामित्र परिवारच्या वतीने साजरा करण्यात आला
यावेळी विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला
या.कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की

औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची प्रक्रिया, १४ जानेवारी १९९४ रोजी पूर्ण झाली नाव देण्यासाठी अनेक वर्षांपासून आंदोलन’ चालले होते यात अनेक आंदोलकांनी आपले बलिदान दिले अशा सर्वांना महामित्र परिवारच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली ज्यामुळे हे नाव मिळाले, तो दिवस आजही त्यांच्या सन्मानार्थ दिन.१४ जानेवारी रोजी ‘नामांतर दिन’ म्हणून साजरा केला जातो, ज्यांनी या लढाईत शहीद झालेल्या दिवस स्मरणार्थ दिवस म्हणून पाळला जातो अशा सर्व शहीद झालेले क्रांतिकारी सलाम
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर घोडेराव सर यांनी केले व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले तर आभार राजेंद्र दिवे यांनी मानले
यावेळी अभिवादन करण्यासाठी उपस्थित महामित्र दत्ता वायचळे आद्यक्रांतिकार राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे रत्नाकर घोडेगाव राजेंद्र दिवे राजेंद्र जगताप आनंद सरोदे मिलिंद साळवे राजूभाऊ घेगडमल अभिशा वायचळे शाम डांगे प्रकाश माळी सोमनाथ लोहारकर रोहित मुठे सुनिल गुरुकुले उपस्थित होते
