
जातेगाव:
शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जातेगाव या विद्यालयाने आपल्या देदीप्यमान यशाची आणि १००% निकालाची परंपरा यावर्षीही जपली आहे.
दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी जाहीर झालेल्या या निकालात विद्यालयाचे एकूण ११७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते, त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयातील एलिमेंटरी परीक्षेस ७० विद्यार्थी
A ग्रेड-०४
B ग्रेड-११
C ग्रेड-५५
निकाल१००%
, तर इंटरमिजिएट परीक्षेस ४७ विद्यार्थी
A ग्रेड-१४
B ग्रेड-१३
C ग्रेड-२०
निकाल-१००%
विद्यालयाच्या या यशाबद्दल म.वि.प्र. संचालक इंजि. अमितभाऊ बोरसे पाटील (नांदगाव) यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष कौतुक केले आहे. या यशात शाळेचे कला शिक्षक, स्कूल कमिटी अध्यक्ष व सर्व सदस्य, तसेच प्राचार्य श्री. धुळे पी.के. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि ग्रामस्थांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. चित्रकला क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे यश प्रेरणादायी ठरणार आहे.
