
मुळडोंगरी ( प्रतिनिधी)सरस्वती माध्यमिक विद्यालय मुळडोंगरी येथे राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संस्थापक माननीय श्री एस जी राठोड साहेब, सचिव श्री सिद्धांत दादा राठोड व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ बोरसे एस एस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच राष्ट्रमाता जिजाऊ यांनी शिवरायांवर केलेले संस्कार विशद केले. व स्वामी विवेकानंद यांनी दिलेला उठा जागे व्हा व ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका हा संदेश आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे समजावून सांगितले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री निकम सर व भामरे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
