
यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करताना मुख्याध्यापिका सुनीता बाजपेयी , उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी विद्यार्थी यांच्यासह शिक्षक व कर्मचारी.
नाशिक (प्रतिनिधी ) नाशिक येथील यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज नाशिक या विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी मुख्याध्यापिका सौ.सुनीता बाजपेयी व उपमुख्याध्यापक श्री.राजेंद्र सोमवंशी यांच्या हस्ते विद्यार्थी आणि शिक्षक-कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले. विद्यार्थिनी अद्विका ज्ञानेश्वर शिरसाट , जानवी महेंद्र गांगुर्डे,मानसी गणेश पाटील ,निशा ज्ञानेश्वर जाधव ,विधी योगेश मुर्तडक
यांनी भाषण केले.
मुख्याध्यापिका सौ.सुनीता बाजपेयी यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा आढावा घेतला. सांस्कृतिक विभागप्रमुख सौ.लता शिंदे व सौ.रंजना खैरनार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
यावेळी सिमा कोळी,दिपाली ठाकूर प्रतिभा महाजन ,चेतना टोपले,
छगन मुकणे ,विजय सरोदे , सायली मुळे आदि शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मन्विता स्वप्निल सोनवणे हिने केले.

