
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१५५ वा दिवस
मुस्लिम या देशात आले तेव्हा त्यांनी किती शिपाई बरोबर आणले होते? या देशावर राज्य करणारे ब्रिटिश तरी संख्येने किती आहेत? चार रुपड्यांसाठी आपल्या रक्तामांसाच्या भाऊबंदांचे गळे कापणारे मुर्दाड लोक या दुर्दैवी देशापासून कोठे बरे सापडतील? सातशे वर्षांच्या इस्लामी अंमलात सहा कोटी लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारला. आणि शंभर वर्षांच्या ब्रिटिश आमदानीत वीस लाख लोक ख्रिस्ती झाले! असे का घडले? आम्ही आमची मूलभूत विचारक्षमताच हरून बसलो आहोत का ? बोटात जादू असलेले आमचे कारागीर युरोपियनांशी चाललेल्या स्पर्धेत निष्प्रभ का ठरताहेत? आणि ब्रिटिश कामगारांची गेली कित्येक शतके अबाधित असलेली प्रतिष्ठा डळमळीत करण्याची ताकद नव्या जर्मन कारागीरात कुठून आली? शिक्षण, शिक्षण आणि शिक्षण एवढेच याचे उत्तर! शिक्षणातून आत्मश्रद्धेचा जन्म होतो.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष २९ शके १९४७
★ माघ शुद्ध /शुक्ल १
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. १९ जानेवारी २०२६
★ १७३६ वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे स्कॉटिश शास्त्रज्ञ आणि संशोधक जेम्स वॅट यांचा जन्मदिन
★ १९५६ देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा अध्यादेश.
★ १९६६ जगातील दुसऱ्या व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून श्रीमती इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदाचा कारभार स्विकारला.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
