
नांदगाव (प्रतिनिधी):येथील जायंट्स ग्रुप ऑफ नांदगावच्या वतीने ‘राष्ट्रीय युवा दिन’ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचिजायंट्स ग्रुप ऑफ नांदगाव तर्फे स्वामी विवेकानंद जयंती व युवा दिन उत्साहात साजरा.त्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ग्रुपचे सचिव श्री. प्रसाद बुरकूल सर यांनी ग्रुपला स्वामी विवेकानंदांची प्रतिमा भेट देऊन आपला उत्साह साजरा केला.मान्यवरांची उपस्थितीया कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री. जगन्नाथ साळुंखे सर उपस्थित होते. तसेच जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष श्री. सोमनाथ दुसाने, श्री. बळवंत शिंदे, श्री. सुमित गुप्ता नूतन अध्यक्ष श्री. विजय बागोरे आणि श्री. गौरव दुसाने यांसह इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.विवेकानंदांच्या विचारांची शिदोरीकार्यक्रमात बोलताना श्री. जगन्नाथ साळुंखे सरांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. “उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका,” हा त्यांचा संदेश आजही तरुणाईसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. स्वामीजींच्या विचारांनीच राष्ट्राची प्रगती शक्य असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.कृतज्ञता व्यक्तकार्यक्रमाच्या शेवटी श्री. सुमित गुप्ता यांनी उपस्थितांचे आभार मानले. सचिव प्रसाद बुरकूल यांनी दिलेल्या भेटीबद्दल सर्व सदस्यांनी त्यांचे कौतुक केले. या उपक्रमामुळे ग्रुपमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
