
जळगाव निंबायती (वार्ताहर) – एलिमेंटरी व इंटरमिजिएट शासकीय ग्रेड रेखाकला परीक्षेत येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एलिमेंटरी परीक्षेत एकूण १२ विद्यार्थी प्रविष्ट होते.
१)श्रेणी (A)
एकूण विद्यार्थी संख्या १ २)श्रेणी (B) एकूण विद्यार्थी संख्या ५
३)श्रेणी (C)
तर इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत एकूण ८ विद्यार्थी प्रविष्ट होते.
१) श्रेणी (B)
एकूण विद्यार्थी संख्या _2
२) श्रेणी (C)
याप्रमाणे श्रेणीनुसार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक आर. एस. काळे यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कासूताई रोडूआण्णा पाटील, सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, सर्व संचालक, विश्वस्त, पदाधिकारी, पर्यवेक्षक व्ही डी. काळे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
