
रोहिले (प्रतिनिधी) माध्यमिक विद्यालय रोहिले बुद्रुक येथे जयंती साजरी करण्यासाठी श्री संत सेवालाल महाराज संचलित संस्था अध्यक्ष एस. जी . राठोड साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका सौ जयश्री एस. जाधव मॅडम यांची निवड करण्यात आली तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्रीयुत सय्यद सर यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ जाधव मॅडम व प्रमुख अतिथी श्रीयुत सय्यद सर यांनी प्रतिमा पूजन केले. स्वराज्याची जननी मा जिजाऊ साहेब यांच्या जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या कार्यावर विद्यार्थ्यांनी भाषणे केली. याप्रसंगी श्रावणी अरबूज या विद्यार्थिनीने मा जिजाऊ ची वेशभूषा केली होती श्री बाबासाहेब सोनवणे सर, श्री पाडवी सर व प्रशांत पवार सर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री सय्यद सर यांनी मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जाधव मॅडम यांचे अध्यक्षीय भाषण झाले. श्रीयुत राजेंद्र गोवील सर यांनी आभार व्यक्त केले. अध्यक्षांच्या सूचनेवरून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
