
लासलगाव, ता. १२ ( प्रतिनिधी) : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर विभागाच्या वतीने दिनांक १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालय, पुणे आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दि. १२ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताह अंतर्गत सोमवार दिनांक १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रमोद खाटेकर सर यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.सोमनाथ आरोटे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर प्रा.किशोर गोसावी, प्रा.जितेंद्र देवरे, राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर चे कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे इत्यादी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री राजोळे या विद्यार्थिनीने केले, प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय प्रा.सुनिल गायकर यांनी करून दिला तर आभार प्रा.देवेंद्र भांडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
