
नांदगाव (प्रतिनिधी) मराठा विद्या प्रसारक समाजाच्या होरायझन अकॅडमी नांदगाव शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या श्रीमती.पुनम डी मढे होत्या
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या श्रीमती. पुनम डी. मढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शरयू आहेर,सोनाली खैरनार मंच वर उपस्थित होत्या शालेय विद्यार्थी यांनी जयंती प्रसंगी मनोगत मांडले. अध्यक्षीय भाषणात शालेय प्राचार्या यांनी आपल्या भाषणातून राजमाता जिजाऊंचे शिवरायांच्या घडणीतील योगदान तसेच स्वामी विवेकानंदांचे युवकांसाठीचे विचार यांचे महत्त्व विशद केले. तसेच युवा पिढी चांगली घडावी म्हणून आजचा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घ्यावा. तसेच प्रेरणादायी विचारांचे वाचन करण्यात आले. “उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका” या स्वामी विवेकानंदांच्या संदेशाचा उपस्थितांनी संकल्प केला.
या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रात बालविवाह प्रथा मुक्त व्हावी म्हणून बालविवाह प्रतिबंध विषयी प्रतिज्ञा केली. कार्यक्रमाचे नियोजन शालिनी गोयल,सूत्रसंचालन प्राप्ती गायकवाड,समृध्दी थोरात यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
