
नांदगाव (प्रतिनिधी ) मविप्र समाजाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने वाखारी येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार शिबीर दिनांक ८/१/२०२६ ते १४/१/२०२६ पर्यंत होत आहे. पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी डॉ. बी.एम. आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी गावाच्या वस्तीतील रस्त्यावरील खड्डे बुजून रस्ता खड्डे मुक्त केला. आज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. यु. पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ. एस. ए. मराठे, गावाचे उपसरपंच श्रीमती सुनिता संजय काकळीज, माजी सैनिक मनिष चव्हाण ,श्री.भारत देवरे व गावातील जेष्ठ नागरिकांनी स्वयंसेवकांनी केलेल्या कामाची पाहणी करून स्वयंसेवकांची प्रशांसा केली.

दुसऱ्या बौद्धिक सत्रात MH-41उपप्रादेशिक अधिकारी मा.श्री विनोद जाधव यांनी १२ जानेवारी स्वामी विवेकानंद जन्म युवा दिनाचे औचित्य साधुन युवा आणि व्यसन या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच त्यांचे सहकारी मोटार वाहन निरीक्षक श्री अमोल पवार यांनी रस्ता सुरक्षा या विषयावर पीपीटीच्या माध्यमातून सखोल मार्गदर्शन केले. सहायक वाहन निरीक्षक श्रीमती प्रतिक्षा चौधरी, चालक दशरथ शेवाळे हे देखील उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा परिषद शिक्षक ज्ञानेश्वर आहिरे, महाविद्यालयातील भौतिक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एस. शेंडगे, प्रा.आर. व्ही. वाघ, डॉ. मेसराम, बी.पी. मोरे, प्रा.बी.पी. गोरे, डॉ.बी बी.धोंगडे, रा.से.यो. सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.डी.डी. ठाकरे, प्रा.श्रीमती पी.डी. पाटील, श्री विलास आहेर, श्री गोरख काकळीज व स्वयंसेवक उपस्थित होते.
