
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१३६ वा दिवस
आपल्या सर्वांना नेतृत्व हवे असते, पण त्यासाठी त्याग करण्याची तयारी मात्र नसते. परिणाम काय? आपले कोणीच ऐकत नाही. नेत्याने पक्षपात करणे म्हणजे संघटनेच्या विनाशाला निमंत्रण देण्यासारखेच आहे. कोणा एका विषयी अधिक ममत्वबुद्धी वा पूर्वग्रहदूषित सूडबुद्धी दाखविण्यास तुम्ही सुरुवात केली की दुहीची बीजे पेरली गेलीस म्हणून समजा. नेत्याचे सर्वांवर सारखेच प्रेम असले पाहिजे. तरतमभाव दाखविला तर झालेच! ज्याचे प्रेम असीम असते, जो भेदभाव जाणत नाही त्याच्या चरणी सारे विश्व विनीत होते. प्रेम व्यक्ति निरपेक्ष असली पाहिजे. नेता हा निःपक्षपाती असला पाहिजे नाहीतर मत्सर आणि विवाद यांनी संघटना पोखरली जाईल.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष ११ शके १९४७
★ पौष शुध्द /शुक्ल १२
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. ३१ डिसेंबर २०२५
★ पुत्रदा एकादशी 🚩🚩🚩🚩🚩🚩
★ १६०० ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली
★ १९२६ इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा स्मृतीदिन.
