
मनमाड- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आदर्श इंग्लिश मेडिअम स्कूल मनमाड येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मैदानी खेळ,विज्ञान प्रदर्शन, आनंद मेळावा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी दीपप्रज्वलन, सरस्वतीमातेचे तसेच शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन नियोजित अध्यक्ष शालेय समितीचे सदस्य श्री. दामू अण्णा पाटील, उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब साळुंखे साहेब व उपस्थित मान्यवरयांच्या हस्ते करण्यात आले.

मंचावर श्री. साळवे सुनिल,श्री. कांबळे नरेंद्र,श्री.संसारे सिद्धांर्थ,श्री.शिंदे अरविंद, श्रीमती. बेग मुमताज,श्री. चव्हाण सर,श्री.गवळी सर ई. मान्यवरउपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका शितल आहेर यांनी केले.रोजच खेळाच्या तासिकेला खेळले जाणारेखेळ,व वार्षिक क्रिडा महोत्सवात प्रत्यक्ष स्पर्धेमध्ये सहभागी होऊन यश अपयशाला सामोरे जाणे. व त्यातून नवीन शिकवण घेणे
हा मुख्य उद्देश आहे हे सांगितले.

दोन दिवस विज्ञान प्रदर्शन व विद्यार्थी आनंद मेळावा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्व मान्यवर व पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगतात श्री. दामुअण्णा पाटील यांनी सर्व खेळातील सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.तसेच उपाध्यक्ष श्री.बाळासाहेब साळुंखे,श्री.कांबळे नरेंद्र यांनी देखील विद्यार्थी खेळाडूंना अभ्यासातून विरंगुळा म्हणून खेळाकडे बघितले जाते. व मोबाइल खेळापेक्षा मैदानी खेळ नैत्रत्व, चिकाटी,सांघिक भावना इत्यादी गुणांचा विकास होत असतो. मैदानी खेळ खेळणे ही काळाची गरज आहे असे सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. मविप्र नांदगाव संचालक श्री. अमितभाऊ बोरसे-पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना क्रिडा महोत्सव तसेच इतर उपक्रमांना शुभेच्छा दिल्या
हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन शिक्षिका सुप्रिया शिंदे यांनी केले.
