
नाशिक:-(प्रतिनिधी ) सातारा येथे संपन्न होणाऱ्या ९९व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात नाशिक येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.गिरीश सी.पाटील यांच्या ‘क्रिकेट आणि लाईफ मॅनेजमेंट’ ह्या प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन ३ जानेवारी रोजी दुपारी १ते ५ वाजेदरम्यान संपन्न होणार असल्याचे संमलेन कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत आणि चपराक प्रकाशनाचे प्रकाशक घनश्याम पाटील यांनी दिली.
प्रा.डॉ.गिरीश सी.पाटील यांचे हे आठवे पुस्तक आहे. चपराक प्रकाशन वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तक वाचकांसाठी प्रकाशित करत असते. ‘क्रिकेट आणि लाईफ मॅनेजमेंट’ हे असेच वेगळ्या विषयावरील प्रेरणादायी पुस्तक चपराक प्रकाशनच्या वतीने प्रसिद्ध होत आहे. क्रिकेट आणि जीवनाचा तुलनात्मक अभ्यास पुस्तकातील पन्नास प्रकरणांमध्ये असल्याने हे पुस्तक वाचकांच्या पसंतीला उतरेल; असा विश्वास प्रा.डॉ.गिरीश सी.पाटील यांनी व्यक्त केला. या पुस्तकाबद्दल प्रा.डॉ.पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
