
ओझर: दि.२७( वार्ताहर) येथील ‘मविप्र’ संचालित माधवराव बोरस्ते विद्यालयात राष्ट्रीय गणित दिन व विज्ञान प्रदर्शनानिमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात रांगोळी वकृत्व निबंध पोस्टर्स गणितीय मॉडेल्स भित्तीपत्रके आदी स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता. त्यात श्रेया कदम तन्वी मोरे रांगोळी, काव्या भारत काळे निबंध, सर्वस्वी महेश चौधरी वकृत्व, ओमकार प्रशांत क्षिरसागर गणित चार्ट, दर्शन पवार शुभम मोरे श्लोक गांगुर्डे कृष्णा चव्हाण आशुतोष जीवरक गणितीय मॉडेल्स, या विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यानिमित्ताने यशस्वी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे व सर्व विज्ञान शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षिका मंगल सावंत सरोज खालकर संगीता शेटे सोनल माळोदे अर्चना घुमरे ज्योती पाटील सुप्रिया भंडारे राजश्री मोहन यांनी परिश्रम घेतले. फलक रेखाटन सविता पवार मोनाली निकम व मोहन क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका संगीता शेटे यांनी केले. आभार शितल हांडोरे यांनी मानले.
